सामाजिक न्याय, हक्क आणि परिवर्तनाचा निर्धार:-

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ ही एक वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी असलेली संघटना आहे...

आमचे प्रमुख उद्दिष्ट:-

  • ओबीसी समाजातील व्यक्तींना सामाजिक न्यायाची सखोल जाणीव करून देणे.
  • भारतीय राज्यघटना, मंडल आयोग, आणि सामाजिक सुधारकांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे.
  • प्रत्येक ओबीसी नागरिकाला घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांची माहिती देणे.
  • इंटरनेट आणि डिजिटल साधनांद्वारे ओबीसी साक्षरता वाढवणे.
  • जातिवाचक ओळख ऐवजी वर्गीय चळवळीची बांधिलकी निर्माण करणे.
  • इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती व प्रगतिशील घटकांशी सुसंवाद आणि सहकार्य वाढवणे.

आमचे ध्येय (Our Vision):-

  • भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत अंतर्भूत असलेली स्वतंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्त्वे प्रत्यक्षात आणणे.

आमची कामाची दिशा

  • प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आणि वेबिनारचे आयोजन
  • घटनात्मक साक्षरता अभियान
  • ओबीसी सेवा क्षेत्रातील प्रश्नांवर अभ्यास, चर्चा आणि प्रतिनिधित्व
  • सामाजिक प्रश्नांवर संवाद व नीतिनिर्धारण उपक्रम
  • युवा नेतृत्व विकास कार्यक्रम

आमचे मिशन

  • घटनात्मक मूल्यांवर आधारित जागरूक अधिकारी-कर्मचारी संघटना उभारणे.
  • ओबीसी समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम, सुशिक्षित आणि संघटित करणे.
  • समाजातील अन्याय, असमानता आणि भेदभावाविरुद्ध वैचारिक चळवळ उभी करणे.